सोलापूरहून विमान वाहतूक चालू होण्याचा मार्ग झाला मोकळा !

सोलापूर – सोलापूर विमानतळासाठी आवश्यक असलेली सुरक्षा संमती (सिक्युरिटी क्लिअरन्स) मिळाली आहे. ‘नागरी वाहतूक सुरक्षा ब्युरो’ने सोलापूरहून विमानसेवा चालू होण्यासाठी आवश्यक असलेली संमती दिली आहे. एका आठवड्यातच ‘डीजीसीए’कडून एरोड्रोम लायसन्स मिळणार असल्याचे ‘डीजीसीए’च्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता सोलापूरहून विमान वाहतूक चालू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

१३ आणि १४ ऑगस्ट या दिवशी सोलापूर विमानतळाची पहाणी संबंधित पथकाने करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्या सर्व सूचनांची पूर्तता करण्यात आली आहे. तसा अहवाल भारतीय प्राधिकरणाने हवाई मंत्रालय आणि अन्य एका यंत्रणेला सादर केला होता. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर विमानतळाला विमानसेवेसाठी संमती मिळाली आहे.