निलंबित केलेल्या सहयोगी प्राध्यापकाच्या चौकशीनंतर कारवाई होणार ! – मुंबई महानगरपालिका
नायर रुग्णालयात विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचे प्रकरण
मुंबई – नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सहयोगी प्राध्यापकाला पालिका प्रशासनाने निलंबित केले. या प्रकरणाची चौकशी महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र प्रमुख अंतर्गत तक्रार समितीकडे सोपवण्यात आली आहे. या समितीकडून चौकशीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणार्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे.