मनाचे पावित्र्य टिकल्यास परमेश्वर साहाय्य करत असल्याने मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवा !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

‘घर कितीही स्वच्छ असले, तरी त्याची नियमित झाडलोट करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे मनाचे पावित्र्य टिकवण्यासाठी प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे. स्वच्छ, पवित्र आणि प्रामाणिक मनुष्याला परमेश्वर साहाय्य करतो; म्हणून आपले हृदय, तसेच मन बालकाप्रमाणे स्वच्छ आणि निर्मळ ठेवावे. मनाची एकाग्रता प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते.’ (ऑगस्ट २००२)