BAPS Swaminarayan Temple Vandalised : न्‍यूयॉर्कमध्‍ये स्‍वामीनारायण मंदिराची तोडफोड

  • भिंतींवर लिहिण्‍यात आल्‍या भारतविरोधी घोषणा

  • भारतीय दूतावासाने केला निषेध

न्‍यूयॉर्क (अमेरिका) – न्‍यूयॉर्कच्‍या मेलव्‍हिले भागातील स्‍वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्‍यात आली आहे. तसेच मंदिराच्‍या भिंतींवर भारतविरोधी घोषणाही लिहिण्‍यात आल्‍या आहेत. या घटनेनंतर न्‍यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्‍य दूतावासाने तीव्र शब्‍दांत निषेध नोंदवला आहे. दूतावासाने परिपत्रक प्रसारित करत म्‍हटले आहे की, या घटनेविषयी अमेरिकेतील अधिकार्‍यांशी चर्चा करण्‍यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी केली आहे.

मंदिर प्रशासनाने म्‍हटले आहे की, मागच्‍या काही दिवसांत उत्तर अमेरिकेतील काही मंदिरांमध्‍येही अशाच प्रकारच्‍या घटना घडल्‍या आहेत. या सर्व घटनांचा आम्‍ही निषेध करतो, तसेच अमेरिकी सरकारने यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी करतो. आम्‍ही भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांच्‍या संपर्कात असून सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिकेत कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे तीन तेरा वाजले असल्‍याने तेथे सातत्‍याने हिंदूंच्‍या मंदिरांवर आक्रमण होत आहेत. आतापर्यंत अशा घटनांतील किती आरोपींना अमेरिकेने शिक्षा केली आहे ?