Chief Minister of Delhi : आतिशी सिंह होणार देहलीच्या नवीन मुख्यमंत्री !
नवी देहली – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचे त्यागपत्र दिले असून त्यांच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेल्या आतिशी सिंह देहलीच्या नवीन मुख्यमंत्री असणार आहेत. नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ यांचा शपथविधी याच आठवड्यात होणार आहे. २६ आणि २७ सप्टेंबर या दिवशी विधानसभेचे २ दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
Atishi Singh will be the new Chief Minister of Delhi !
Atishi’s family fought for the terrorist Muhammad Afzal Guru. Today is a very sad day for Delhi! – Swati Maliwal#ArvindKejriwal#AtishiMarlena #AAPDelhi pic.twitter.com/3I5vacuftE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 17, 2024
१३ सप्टेंबरला मद्य धोरण घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते की, मी प्रामाणिक कि अप्रामाणिक हे आता जनतेने ठरवावे. जनतेने हा डाग धुवून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून दिला, तर मी पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसेन.
आतिशी यांचे कुटुंब आतंकवादी महंमद अफझलसाठी लढले ! – स्वाती मालीवाल
आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या आणि राज्यसभेतील खासदार स्वाती मालीवाल म्हणाल्या की, आम आदमी पक्षाने आतिशी यांना मुख्यमंत्री केले आहे ज्यांचे कुटुंब आतंकवादी महंमद अफझल याच्यासाठी लढले. देव देहलीचे रक्षण करो. देहलीसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखाचा आहे.