Krishna Janmabhoomi-Shahi Idgah dispute : हिंदूंच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार !
श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाला दिला धक्का !
मथुरा (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती देण्यास नकार दिला.
१. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी ईदगाह मशीद समिती सर्वोच्च न्यायालयात गेली होती. उच्च न्यायालयाने हिंदु पक्षकारांची याचिका सुनावणीस योग्य मानल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप घेत मशीद समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली.
२. सर्वोच्च न्यायालयाने मशीद समितीच्या याचिकेवर सुनावणी करतांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ४ नोव्हेंबरला होणार आहे.
३. १ ऑगस्ट २०२४ या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरण सुनावणीस योग्य मानले होते. उच्च न्यायालयाने शाही इदगाह मशिदीच्या मालकीविषयी हिंदु पक्षकारांनी प्रविष्ट केलेल्या सर्व १५ दिवाणी दाव्यांचा विचार करून मुसलमानांच्या बाजूने प्रविष्ट केलेले पाचही आक्षेप फेटाळले. या निर्णयाला ईदगाह समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.