बोरखेडा (जळगाव) येथे धर्मांधांकडून गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक !
|
जळगाव, १६ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक निघाली असता मार्गातील बोरखेडा येथे मशिदीजवळ धर्मांधांनी वाद्य वाजवण्यास बंदी घातली. त्यानंतर वाद्य न वाजवता मिरवणूक मशिदीपासून पुढे नेण्यात आली. तेथे पुन्हा हिंदूंनी वाद्य वाजवायला आरंभ केला. त्यानंतर धर्मांधांनी मूर्तीच्या दिशेने दगडफेक केली. या वेळी धर्मांधांनी अनेक गणेशभक्तांवरही आक्रमण केले. या घटनेनंतर पोलिसांनी शांतता कमिटीची बैठक बोलवली; मात्र कुणाविरुद्धही गुन्हे नोंदवण्यात आले नाहीत.