Counter procession on Eid Milad : (म्हणे) ‘धमक असेल, तर ईदची मिरवणूक थांबवून दाखवा !’ – महंमद शरीफ

  • बी.सी. रोड (कर्नाटक) गावात तणावाची स्थिती !

  • मुसलमानांकडून हिंदूंना आव्हान

  • हिरवे ध्वज घेऊन मोटारसायकलवर रॅली !

मंगळुरू (कर्नाटक) – ‘धमक असेल, तर ईदची मिरवणूक थांबवून दाखवा’, असे आव्हान करणार्‍या येथील एका मुसलमान नेत्याचा ऑडिओ प्रसारित झाल्याने दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बी.सी. रोड गावात हिंदु संघटनांनी ‘चलो बी.सी. रोड (बंट्वाळ क्रॉस रोड)’ असे आवाहन केले. तेथे अनेक हिंदुत्वनिष्ठ जमले. या वेळी हिंदूंनी तेथे निषेध आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना शांत केले. एवढ्यात काही धर्मांध मुसलमानांनी हातात हिरवे ध्वज घेऊन मोटारसायकलवरून रॅली काढली. यातून एकप्रकारे त्यांनी उपस्थित हिंदूंना चिथावणी दिली.

या वेळी ‘आम्हाला मिरवणूक काढण्याची अनुमती देत नाही, तर मुसलमानांना कशी काय देता ?’, असे म्हणत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते रस्त्यावर बसून आंदोलन करू लागले. पोलिसांच्या विरुद्धही घोषणा दिल्या जात होत्या.


काय आहे प्रकरण ?

मंड्या जिल्ह्यातील नागमंगल येथे काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले होते. या संदर्भात मंगळुरू येथे शरण पंपवेल या हिंदु नेत्याने म्हटले होते की, ईदच्या मिरवणुकीवर आक्रमण झाले, तर काय होईल ? याला प्रत्युत्तर म्हणूनच महंमद शरीफ या धर्मांध मुसलमान नेत्याने ‘ईद मिलाद मिरवणूक थांबवूनच दाखवा’ या चिथावणीखोर वक्तव्याचा स्वत:चा ऑडिओ प्रसारित केला.