मराठा आरक्षणावर लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा १८ सप्टेंबरची सकाळ पहाणार नाही ! 

राजश्री उंबरे यांची राज्य सरकारला चेतावणी !

छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणासाठी आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहे. त्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे शिष्टमंडळ भेटायला येणार आहे. राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्यास उपोषण सोडू. अन्यथा १८ सप्टेंबरची सकाळ पहाणार नाही, अशी चेतावणी मराठा आंदोलक राजश्री उंबरे यांनी १४ सप्टेंबर या दिवशी राज्य सरकारला दिली आहे.

मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटिअर लागू करून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, शेतकरी-कष्टकर्‍यांच्या मुलांना विनामूल्य शिक्षण द्यावे आणि ई.डब्ल्यू.एस्. आरक्षण पूर्ववत् लागू करावे, अशा मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे यांचे क्रांती चौकात १३ दिवसांपासून उपोषण चालू आहे.