भिवंडी येथील श्री गणेशमूर्तींच्या कारखान्यातील गणेशमूर्तींची तोडफोड
भिवंडी (जिल्हा ठाणे) – येथील पद्मानगर भागातील भाजी बाजार परिसरात श्री गणेशमूर्तींच्या कारखान्यातील श्री गणेशमूर्तींची १३ सप्टेंबर, म्हणजे शुक्रवारी रात्री तोडफोड झाली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
११ सप्टेंबर या दिवशी मालक राजेंद्र गादी यांनी कारखाना बंद केला होता. १३ सप्टेंबर या दिवशी कारखाना उघडला असता जवळ जवळ सर्वच मूर्तींचे हात, सोंड, किंवा मुख यांपैकी काही ना काही तुटलेले होते. अनेक मूर्ती दुखावल्या गेल्या. यामुळे मूर्तीकाराची पुष्कळ हानी झाली आहे. पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :हिंदूंच्या देवतांची विटंबना थांबवण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे ! |