रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय       

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

सौ. दीपाली देशमुख, पुणे, महाराष्ट्र.

‘प.पू. भक्तराज महाराज यांचे (प.पू. बाबांचे) छायाचित्र पहाता क्षणी मला ‘यांना कुठेतरी पाहिले आहे’, असे अकस्मात् आठवले. त्यांना नमस्कार केल्यावर माझ्या डोळ्यांतून पुष्कळ भावाश्रू येत होते; पण मी ते भावाश्रू आवरले. मी संपूर्ण परिसर पाहून आल्यानंतर प.पू. बाबांच्या छायाचित्राला नमस्कार केला. त्यानंतर चित्रपट जसा पुढे सरकतो, तसे सूक्ष्मातून अनेक देव (महालक्ष्मीदेवी, गणपति, तसेच गजानन महाराज) माझ्या डोळ्यांसमोर आले. मी गजानन महाराज यांची भक्त आहे. तेथून उठल्यानंतर मला पुन्हा रडू आले; पण मी ते आवरले. मला आश्रम दाखवत असलेल्या साधिकेला मी ही अनुभूती सांगितली. मला प.पू. बाबांच्या छायाचित्राकडे पाहून समाधान आणि शांती मिळाली.’

(सूत्रांचा दिनांक : २८.६.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील
    म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक