५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कुणिगल (कर्नाटक) येथील चि. शार्वी नागार्जुन (वय ४ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. शार्वी नागार्जुन ही या पिढीतील एक आहे !
आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी (१७.९.२०२४) या दिवशी चि. शार्वी नागार्जुन हिचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. शार्वी नागार्जुन हिला चौथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे चि. शार्वीच्या चेहर्यावर जन्मापासून दैवी तेज आहे. ती आरोग्यसंपन्न बाळ आहे.
२. देवता आणि गुरु यांच्याप्रती भाव
अ. तिच्या जन्मानंतर काही मासांतच ती ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य अन् आध्यात्मिक संशोधन’ हा ग्रंथ वाचल्यासारखे करत असे. ती त्या ग्रंथातील प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राला पापी देत असे.
आ. ती भिंतीवर लावलेल्या देवतांच्या चित्राकडे पाहून तिच्या भाषेत देवतांशी बोलत असे.
३. कृतज्ञताभाव
शार्वी थोडे बोलायला शिकल्यावर गुरुदेवांना ‘पाणी, जेवण आणि खेळणी’ हे उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद’, असे सांगत असे.
४. समंजस
कु. शार्वीचा धाकटा भाऊ रडत असल्यास ती त्याला ‘‘गुरुदेव येतात, रडू नकोस’’, असे सांगून त्याचे रडणे थांबवण्याचा प्रयत्न करते.
५. प्रेमभाव
आम्ही गावी जात असतांना आमच्या हातांत अधिक साहित्य असल्यास ती तिची क्षमता नसतांनाही ‘‘मला द्या’’, असे म्हणून साहित्य घेते.
६. चुकांविषयी संवेदनशील
आम्ही घरातील सगळे जण आमच्या चुका सांगत असतांना ती तत्परतेने तिच्याकडून झालेल्या चुका सांगते. तिला तिच्या चुकांची जाणीव होताच ती क्षमायाचना करते.
७. स्वभावदोष
चिडचिडेपणा आणि हट्टीपणा.’
– सौ. सुमा मंजेश (चि. शार्वीची आजी, कु. शार्वीच्या आईची आई, वय ६३ वर्षे), कुणिगल, जिल्हा तुमकुरू, कर्नाटक. (२२.५.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात.या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |