महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून मोठ्या संख्येने मुसलमान गोव्यात शक्तीप्रदर्शनसाठी गोव्यात आल्याचा संशय !

काणकोण, १६ सप्टेंबर (वार्ता.) – काणकोण येथे ईदनिमित्त जुलूस (मिरवणूक) काढण्यास हिंदूंनी विरोध केल्यानंतर या जुलूसमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले शेजारील राज्यांतील मुसलमान काणकोण, कुंकळ्ळी आणि मडगाव येथील समुद्रकिनार्‍यांवर दिसत आहेत. या संदर्भात काणकोण आणि कुंकळ्ळी येथील जागरूक नागरिकांनी हिंदु बांधवांना सतर्कतेचे आवाहन केले आहे, असे एका नागरिकाने संपर्क करून सांगितले. येथील सौ. शैला देसाई यांनी बेतुल समुद्रकिनारी जात असलेली ४-५ चारचाकी वाहने एका शितपेयाच्या दुकानाजवळ थांबली असता, त्यातील प्रवाशांची चौकशी केली. तेव्हा प्रारंभी त्यांनी कळंगुट येथून आल्याचे आणि नंतर महाराष्ट्रातून आल्याचे सांगितले. हे सर्व हिंदीत बोलत होते.

काणकोण येथील जुलूसला प्रशासनाने मान्यता नाकारल्याने काही प्रमाणात महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतून अगोदरच नियोजनानुसार आलेले काही मुसलमान गोव्यात समुद्रकिनारी मौजमजा वा अन्य काही गोष्टी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे; मात्र प्रत्यक्षात डिचोली, फोंडा आदी ठिकाणी ईदनिमित्त काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये (मिरवणुकीमध्ये) मुसलमानांचा सहभाग प्रतिवर्षीपेक्षा अधिक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शक्तीप्रदर्शनसाठी परराज्यांतील हुब्बळ्ळी, भटकळ, कारवार आदी भागांतून मुसलमान या मिरवणुकांत सहभागी झाले होते का ? याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा, अशी काही जणांची मागणी आहे.