Mahoba Stone Pelting : महोबा (उत्तरप्रदेश) येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिवरणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !
महोबा (उत्तरप्रदेश) – येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक कसौराटोरी या मुसलमानबहुल भागातून जात असतांना धर्मांधांनी मिरवणुकीवर दगडफेक केल्याची घटना १४ सप्टेंबरला घडली.
१. ही मिरवणूक कसौराटोरी येथून जात असतांना मिरवणुकीत वाजवण्यात आलेल्या एका फाटाक्याची ठिणगी चुकून तेथीलच एका घरावर पडली. यानंतर वाद चालू झाला.
२. यानंतर धर्मांधांनी तात्काळ मिरवणुकीवर रिकाम्या बादल्या फेकून मारल्या आणि नंतर दगडफेक केली. यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले.
३. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोचले आणि त्यांनी अनेकांना कह्यात घेतले. यानंतर संतप्त झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यालाच घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी केली, तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
आरोपींच्या मुसक्या आवळा ! – विहिंप
या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज शिवहरे म्हणाले, ‘‘श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी गणेशभक्तांवर करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे गणेशभक्तांमध्ये प्रचंड संताप आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी.’’
संपादकीय भूमिका
|