नालासोपारा येथे ख्रिस्ती व्यक्तीकडून श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक उधळवण्यासाठी मिरच्यांची धुरी !
नालासोपारा (जिल्हा पालघर) – येथील डिसिल्वानगर भागात मायकल लोपीस यांनी त्यांच्या घराबाहेर मिरचीची धुरी करून श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
रात्री ८ वाजता येथील साई युवा मंडळाची मिरवणूक जात होती. बोडणनाका येथे रहाणारे निवृत्त ख्रिस्ती शिक्षक मायकल लोपीस यांनी त्यांच्या घराबाहेरील अंगणात पेटत्या निखार्यावर मिरच्या टाकून त्याची धुरी केली आणि मिरवणूक येताच त्या मिरच्या अंगणाच्या मुख्य दरवाजाजवळ नेऊन ठेवल्या. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी व्यक्तींना खोकल्याचा त्रास झाला, तसेच त्यांच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले.
लोपीस एवढ्यावरच थांबले नाहीत, तर वरील प्रकाराविषयी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारल्यावर त्यांनी घरातून लाकडी दांडका आणून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावरून लोपीस यांनी हे कृत्य गणेशभक्तांना त्रास देण्यासाठी मुद्दामहूनच केल्याचे सिद्ध झाले.
एवढ्यावरच न थांबता या घटनेनंतर लोपीस यांनी १४ सप्टेंबर या दिवशी त्यांनी फळ्यावर पुढील आक्षेपार्ह लिखाण करून फलक घराच्या दरवाजाबाहेर ठेवला. ‘स्वतःला पवित्र व देवभक्त समजणारे, पुरुष जकातदार, धनवान ह्यांना प्रभु येशू म्हणतो, ‘ढाेंग्यांनो, सापाच्या पिल्लांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार !’ त्यामुळे यानंतर नालासोपारा येथे मोठा तणाव निर्माण झाला. अनेक परिसरातील शेकडो नागरिकांनी लोपीस यांच्या घराबाहेर एकत्र येऊन घोषणा दिल्या. नागरिकांनी त्यांना या लिखाणाविषयी जाब विचारला.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी लोपीस यांना नोटीस बजावली आहे; मात्र कुठलीही तक्रार प्रविष्ट केली नाही. पोलिसांनी हिंदूंनाच समाजमाध्यमांवर अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे.
संपादकीय भूमिका :
|