Aligarh Muslim Girl Seeks Protection : माझे कुटुंबीय मला मारून टाकतील, मला साहाय्य करा !
हिंदु प्रियकराच्या मुसलमान प्रेयसीकडून योगी आदित्यनाथ यांच्याकडे याचना
अलीगड (उत्तरप्रदेश) – माझे कुटुंबीय मला मारून टाकतील, मला साहाय्य करा, अशी याचना अलीगड येथील हिंदु प्रियकराच्या मुसलमान प्रेयसीने उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली. या संदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात युवती म्हणाली, ‘‘माझ्या प्रियकराचे नाव शौर्य वर्मा असे असून तो हिंदु आहे. माझासुद्धा हिंदु धर्मावर विश्वास आहे. मला शौर्यशी विवाह करायचा आहे. हा माझा ठाम निर्णय आहे. मी तो कधीही पालटणार नाही; परंतु आमच्या विवाहाला माझ्या कुटुंबियांचा तीव्र विरोध आहे. मला माझ्या कुटुंबियांनी घरात कोंडून ठेवले असून ते माझी हत्याही करू शकतात.
My family will kill me, please help me. – a Mu$l!m girl’s plea to Yogi Adityanath, for having relationship with a Hindu boy.
👉 Strangely, the ‘love has no religion’ protagonists have suddenly disappeared. pic.twitter.com/UfZsKxZR22
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 17, 2024
यावर पोलिसांनी सांगितले की, दोघेही जण सज्ञान असून त्यांनी एकमेकांशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलीस त्यांना संरक्षण देतील आणि संपूर्ण साहाय्यही करतील.
संपादकीय भूमिकाएरव्ही हिंदूंना ‘प्रेमाला धर्माचे बंधन नसते’, असा फुकाचा सल्ला देणारे आता गप्प का ? |