Bangladeshi infiltration : महिन्याभरात ५० सहस्र बांगलादेशींचा भारतात प्रवेश !
|
सिल्हेट (बांगलादेश) – आम्ही बांगलादेशी हिंदू आमची दैनावस्था शब्दांत मांडू शकत नाही. आमच्यावर विविध प्रकारची संकटे आहेत. गेल्या महिन्याभरात तब्बल ५० सहस्र बांगलादेशींनी त्यांच्यावर कट्टरतावादी मुसलमानांकडून आक्रमणे होतील, या भयापोटी भारतात पलायन केले आहे. यामध्ये अनेक हिंदुत्वनिष्ठ नेते, तसेच अवामी लीग पक्षाचे कार्यकर्ते आणि ‘अन्सारुल्ला बांगला टीम’ या आतंकवादी संघटनेचे सदस्य यांचा समावेश आहे. भारत-बांगलादेश सीमा अत्यंत अक्षम असल्याचेच यातून म्हणता येईल, असे मत बांगलादेशातील एका युवक हिंदु नेत्याने व्यक्त केले. तो ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी तेथील हिंदूंच्या दुरवस्थेविषयी बोलत होता. (बांगलादेशात हिंदुत्वासाठी लढणार्या हिंदु नेत्यांचे नैसर्गिक स्थान हे भारतच आहे; परंतु तेथील हिंदुद्वेष्टे मुसलमान नेते आणि आतंकवादी यांनाही भारतात आश्रय मिळणे, हे अक्षम्य आहे ! यासाठी कुणास उत्तरदायी धरले पाहिजे ? – संपादक)
या नेत्याने मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे अशी !
१. माझा मोठा भाऊ हिंदुत्वनिष्ठ पत्रकार असून प्राण वाचवण्यसाठी तो काही वर्षांपासून आसाममधील गौहत्तीत रहात आहे. त्याला आम्ही भेटूही शकत नाही.
२. अवामी लीगचे उत्तर सुनामगंज येथील हिंदु खासदार रणजीत चंद्र सरकार यांना मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्यांनी बांगलादेश सोडून केव्हाच पलायन केले आहे.
३. कोमिला येथील अवामी लीगचा खासदार बहाऊद्दीन बहार हाही कोलकाता येथे रहात असून त्याने गेल्या वर्षी दुर्गादेवीच्या उत्सवावर अश्लाघ्य टीका केली होती. त्याने म्हटले होते की, दुर्गा उत्सव म्हणजे मद्याचा उत्सव.
४. आज जमात-ए-इस्लामी आणि ‘अन्सारुल्ला बांगला टीम’चे आतंकवादी भारतातील गौहत्ती, कोलकाता, तसेच मेघालयात लपून बसले आहेत.
५. बांगलादेशातील पोलीस खात्यात हिंदु समुदायाचे वरिष्ठ पदावर असलेल्या अधिकार्यांना बडतर्फ करण्याची कारणे शोधली जात आहेत. या माध्यमातून बांगलादेशातील हिंदूंना असाहाय्य करण्याचा प्रयत्न केले जात आहे.
बांगलादेशातील हिंदू हे भारताचेच प्रतिनिधी !
या वेळी या नेत्याने सांगितले की, आम्ही बांगलादेशी हिंदू असलो, तरी शेवटी आम्ही भारताचेच प्रतिनिधित्व करतो. आम्ही भारतासमवेत आहोत. आमच्याविरुद्ध षड्यंत्रे रचली जात आहेत. आमच्यासाठी आवाज उठवा, अन्यथा भारतासाठीच ही मोठी डोकेदुखी होईल, अशी विनंतीही या हिंदु नेत्याने या वेळी बोलतांना केली.
संपादकीय भूमिका
|