मेघालयाचे राज्यपाल एच्. विजयशंकर यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
कोल्हापूर – मेघालय राज्याचे राज्यपाल एच्. विजयशंकर यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची आरती करून पूजा केली आणि देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असणार्या मातृलिंगाचे दर्शन घेतले. या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी पुष्पगुच्छ आणि देवीची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके उपस्थित होते.