विरोधकांकडून आलेली पंतप्रधानपदाची ‘ऑफर’ मी नाकारली ! – नितीन गडकरी
नागपूर – लोकसभेचे निकाल लागल्यानंतर भाजप स्पष्ट बहुमतापासून दूर होता. ही संधी साधून विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने माझ्याशी संपर्क साधून ‘तुम्ही पंतप्रधान व्हा, आम्ही पाठिंबा देतो’, अशी ‘ऑफर’ दिली होती, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. १४ सप्टेंबर या दिवशी शहरातील पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी गडकरी म्हणाले, ‘‘मी त्यांना सांगितले, तुम्ही मला पाठिंबा का द्याल ? आणि मी तुमचा पाठिंबा का घेऊ ? पंतप्रधान होणे हे माझ्या जीवनाचे लक्ष्य कधीच नाही. मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. पदासाठी मी पक्षाशी तडजोड कदापि करणार नाही. माझा दृढनिश्चय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.’’