मिरज येथे गणेशोत्सवात जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत बाळूमामा यांच्याविषयी उत्कृष्ट आध्यात्मिक देखावे !
मालगाव रस्त्यावरील ‘गजरत्न गणेशोत्सव मंडळा’ने ‘संत बाळूमामा यांचा देखावा’ सादर केला आहे. याविषयी मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय कोरे म्हणाले की, देखाव्याच्या ठिकाणी नियमितपणे सडा, रांगोळी काढून तेथे गोमूत्र शिंपडले जाते. तसेच भक्तीगीते लावली जातात.
मिरज येथील ब्राह्मणपुरीमधील भानू तालिमजवळ विश्व चौक गणेशोत्सव मंडळाने ‘संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा’ याविषयीचा उत्कृष्ट देखावा सादर केला आहे. या मंडळाने भक्तीगीते लावली होती.
मिरज येथे गणेशोत्सवात केलेली तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती
भाजपचे उपजिल्हाप्रमुख श्री. जितेंद्र ढोले यांनी गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या घरी तिरुपती बालाजी येथील मंदिराची सुंदर प्रतीकृती बनवली आहे.
अन्य देखावे
१. ब्राह्मणपुरीमधील ‘श्री समर्थ चौक गणेशोत्सव मंडळा’ने श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्याचा सुंदर देखावा केला आहे.
२. नदीवेसमधील विठ्ठल चौक येथील श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळाने प्रतिवर्षीप्रमाणे कीर्तन, व्याख्यान, भजन, काल्याचे कीर्तन, भावगीत-भक्तीगीत असे सलग ११ दिवस कार्यक्रम ठेवले आहेत. मंडळाचे अध्यक्ष श्री. योगेश जाधव म्हणाले की, मंडळाची वर्ष १९५७ मध्ये स्थापना झाली असून गेल्या १८ वर्षांपासून आम्ही धार्मिक कार्यक्रम घेतो.