प्रेमळ, सेवेची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. माधव गाडगीळ (वय ८७ वर्षे) !
‘गुरुदेवांच्या कृपेने श्री. माधव गाडगीळआजोबा (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ८७ वर्षे) यांची माझ्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. स्वावलंबी
गाडगीळआजोबा ८७ वर्षांचे असूनही स्वावलंबी आहेत. ते या वयातही स्वतःचे कपडे धुतात आणि अन्य कामे करतात.
२. नियोजनबद्ध दिनक्रम
आजोबांचा दिनक्रम नियोजनबद्ध आहे. आजोबा प्रत्येक सेवेचे नियोजन करतात आणि ठरलेल्या वेळी सेवा पूर्ण करतात. ते प्रतिदिन ठरलेल्या वेळी अग्निहोत्र करतात.
३. व्यवस्थितपणा
ते त्यांच्या खोलीतील साहित्य जागच्या जागी आणि व्यवस्थित ठेवतात. त्यांच्या खोलीत साधक कधीही गेले, तरीही खोली नीटनेटकी असते.
४. सेवेची तीव्र तळमळ
आजोबा आजींची सेवा करण्याच्या व्यतिरिक्त लिखाणाचे टंकलेखन करण्याची सेवाही करतात. आजोबांमध्ये सेवेची तीव्र तळमळ आहे. आजोबा सतत कार्यरत असतात.
५. प्रेमभाव
आजोबा पुष्कळ प्रेमळ आहेत. मी त्यांच्याकडे सेवेसाठी गेल्यावर ते मला विचारतात, ‘‘तुला सेवेत काही अडचण आली नाही ना ?’’ आजोबांनी मला सेवा करण्यासाठी लागणारे साहित्य आधीच काढून ठेवलेले असते. आजोबा प्रत्येक साधकाची प्रेमाने विचारपूस करतात. त्यांनी खाऊ आणला असल्यास ते सर्व साधकांना देतात.
६. उतारवयातही रुग्णाईत पत्नीची सेवा मनापासून करणे
आजोबांच्या पत्नी (सौ. माधुरी गाडगीळ, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ८१ वर्षे) काही वर्षांपासून अंथरूणाला खिळून आहेत. त्यांना अल्पाहार किंवा जेवण घेण्यासाठी उठून बसता येत नाही. आजोबा आजींची सेवा मनापासून करतात. आजोबांचे त्याविषयी कोणतेही गार्हाणे नसते.
७. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती भाव
गाडगीळआजोबांमध्ये त्यांच्या स्नुषा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती भाव आहे. एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आजोबांसाठी खाऊ आणला होता. आजोबांनी तो खाऊ ‘देवीचा प्रसाद आहे’, असे सांगून आश्रमातील साधकांना दिला. मी त्यांच्या खोलीत प्रसाद घेण्यासाठी गेल्यावर त्यांनी ‘कुणाला प्रसाद दिला आणि कुणाला द्यायचा शेष आहे’, याविषयी सांगितले. त्यांची ‘आश्रमातील प्रत्येक साधकाला प्रसाद मिळावा’, अशी तळमळ होती.
८. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
गाडगीळ आजोबांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. त्यांच्या खोलीतील ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील गुरुदेवांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवतो.
९. गाडगीळ आजोबांच्या खोलीतील ‘श्रीकृष्णाच्या चित्रातील निर्गुण तत्त्वात वाढ झाली आहे’, असे मला जाणवते.
‘हे गुरुमाऊली, आपल्या कृपेमुळेच मला गाडगीळआजोबांचा सहवास मिळाला आणि आपण मला त्यांच्यातील गुणांची जाणीव करून दिली’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.८.२०२४)