बकरी कापण्यासाठी ‘ऑनलाईन’ अनुमती बंद करण्याविषयी न्यायमूर्तींना भाग पाडले !
‘बकरी कापायला ऑनलाईन अनुमती दिल्यामुळे काय अडचणी येतात ?’, हे न्यायालय समजूच शकत नव्हते. ही अनुमती मिळाल्याने एखाद्याच्या दारात बकरी कापली जाणार असेल, तर त्याला काय त्रास होऊ शकतो ?, हे कळण्यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ओक यांच्या न्यायालयात बकरी कापण्याची अनुमती घेतली आणि त्यांना कागद दाखवले, तेव्हा त्यांना त्याचे गांभीर्य लक्षात आले. त्याच दिवशी दुपारी त्यांनी बकरी कापण्याची ‘ऑनलाईन’ अनुमती देण्याचे बंद केले.
– अधिवक्त्या (श्रीमती) सिद्ध विद्या, सर्वाेच्च न्यायालय, देहली आणि मुंबई उच्च न्यायालय.