आरक्षणाविषयीच्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेकडून राहुल गांधीच्या चित्राला ‘जोडे मारा’ आंदोलन !
कोल्हापूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय राज्यघटनेविषयी लोकसभा निवडणुकीत अपसमज पसरवून भारतीय जनतेची ‘इंडी’ आणि ‘महाविकास आघाडी’ने घोर फसवणूक केली आहे. काँग्रेसचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेश दौर्यात भारतीय आरक्षणाविषयी वक्तव्य करून एक प्रकारे भारतीय लोकशाही आणि राज्यघटना यांचा अवमान केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. राहुल गांधी यांनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी शिवसेनेच्या वतीने त्यांच्या चित्राला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले आणि किशोर घाटगे, शहरप्रमुख रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, महिला आघाडी शहरप्रमुख अमरजा पाटील, पूजा भोर, मंगलताई कुलकर्णी, पूजा शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.