हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करा !
चोपडा (जिल्हा जळगाव) येथे पोलिसांकडे तक्रार
चोपडा (जिल्हा जळगाव) – संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये हिंदु देवता आणि संत यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्या हिंदुद्रोही ज्ञानेश महाराव यांच्यावर त्वरित गुन्हा नोंद करावा, अशा मागणीच्या तक्रारीचे आवेदन १४ सप्टेंबर या दिवशी चोपडा येथील सर्व हिंदुत्वनिष्ठांनी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांना दिले. या तक्रार आवेदनात म्हटले आहे की, ज्ञानेश महाराव यांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी जाणून-बुजून आक्षेपार्ह आणि अश्लील विधाने केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करून त्यांना लगेच अटक करावी, तसेच संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन आयोजित केलेल्या संयोजकांवरही गुन्हा नोंद करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
या वेळी हिंदु रक्षा समितीचे श्री. अनिल वानखेडे, राजाराम पाटील, मनीष गुजराथी, श्याम परदेशी, गजेंद्र जैस्वाल, नरेश महाजन, प्रेम घोगरे, शाम सोनार, जितेंद्र महाजन प्रदीप बारी, सुधाकर चौधरी उपस्थित होते.