ऑगस्टमध्ये एस्.टी. महामंडळ प्रथमच १६.८६ कोटी रुपयाने लाभात !
मुंबई – गेली ५ ते ६ वर्षे अनेक आर्थिक संकटांचा सामना करणारे एस्.टी. महामंडळ आता लाभात आहे. ऑगस्ट महिन्यात ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा कमावला आहे. या महिन्यात एस्.टी. महामंडळाचा १६ कोटी ८६ लाख ६१ सहस्र रुपये लाभ झालेला आहे. ९ वर्षांनी, ऑगस्ट-२०२४ मध्ये एस्.टी. महामंडळ लाभात आहे.