रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथील धर्मप्रेमींनी उघड्यावर असलेल्या श्री गणेशमूर्ती पुन्हा विसर्जित केल्या !
ग्रामपंचायतीने मूर्ती दान म्हणून घेतल्या होत्या !
रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) – येथील ग्रामपंचायतीने भाविकांना श्री गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काही भाविकांनी त्यांच्या श्री गणेशमूर्ती दान केल्या होत्या. दान केलेल्या या मूर्ती ग्रामपंचायतीने उघड्यावरच ठेवल्या होत्या, तसेच शेजारीच निर्माल्य टाकून देण्यात आले होते. श्री गणेशमूर्तींची होणारी ही विटंबना लक्षात घेऊन धर्मप्रेमींनी या मूर्ती शेजारील तलावात विसर्जित केल्या. (भाविकांनी ज्या श्रद्धेने श्री गणेशाची पूजा केलेली असते, त्या मूर्ती ग्रामपंचायत जर अशा उघड्यावर ठेवत असेल, तर भाविकांनी यापुढील काळात या मूर्ती दान म्हणून द्यायच्या का ? याचा विचार केला पाहिजे आणि धर्मशास्त्रानुसार त्यांचे विसर्जन केले पाहिजे ! – संपादक)
या धर्मकार्यात धर्मप्रेमी सर्वश्री महादेव आडावकर, अमोल मिसाळ, उमाजी तांबे, ओमराज माळवदे, देवा पुजारी, स्वप्नील उत्तरे, प्रेम गडकरी, संतोष माळवदे, सोन्या शिंदे, नितीन सुतार, प्रशांत सुतार, शीतल पाटील, नामदेव घायदार आणि संदीप शिनगारे सहभागी झाले होते.