देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करणार्या धर्माभिमान्यांसाठी हिंदूंची ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवणे आवश्यक असणे !
१. हिंदु धर्माभिमान्यांवर पोलीस कारवाई झाल्यावर त्यांना साहाय्य करणारी यंत्रणा नसणे; परंतु मुसलमान समाजात तशी यंत्रणा असणे
‘समाजामध्ये हिंदु धर्माचा प्रसार करतांना काही ठिकाणी हिंदु धर्माभिमानी, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याशी संपर्क करत असतांना त्यांच्याकडून अनेक व्यथा मांडल्या जायच्या, उदा. आपली मुले धर्मरक्षणाचे कार्य करत असतांना काही वेळा पोलीस कारवाईत अटक होऊन न्यायालयीन कारवाईला सामोरे जातात. तेव्हा अधिवक्ता नेमण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो, तसेच ‘कारागृहात गेल्यावर घरी अन्नधान्य आणि आर्थिक नियोजन कोण पहाणार ?’, याचा ताण मनावर असतो. याउलट मुसलमान समाजामध्ये त्यांच्या धर्मासाठी काही केल्यास त्यांची यंत्रणा सिद्ध असते. त्यांना सोडवण्यापासून घरच्या अडचणी दूर करण्यापर्यंतचे सर्व साहाय्य मुसलमान समाज करतो.
२. ‘धर्मप्रेमी कारागृहात गेल्यावर त्यांना साहाय्याची आवश्यकता असणे’, याविषयी बैठकीत सांगणे
हे सर्व ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये वर्षभर याविषयीचे विचार घोळत होते. कोल्हापूरमध्ये ‘सकल हिंदू समाजा’ची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये १० संघटनांचे धर्माभिमानी उपस्थित होते. तेव्हा ‘येणार्या आपत्काळामध्ये काही धर्मप्रेमींना जर धर्मकार्य करतांना कारागृहात जावे लागले, तर न्यायालयात खटला लढवतांना त्यांचे खटले अधिवक्त्यांनी विनामूल्य लढवले पाहिजेत, त्यांच्या जामिनाची सोय होणे आवश्यक आहे, तसेच त्यांच्या घरातील आर्थिक व्यवस्था आपल्याला पहावी लागेल’, असे मी सर्वांना सांगितले.
३. धर्मप्रेमी कारागृहात गेल्यावर त्यांना साहाय्य करण्याचे दायित्व हिंदु संघटनांनी स्वीकारणे
बैठकीत मांडलेला विषय सर्वांना पटला आणि याचे दायित्व प्रत्येक संघटनेने विभागून घेतले. अधिवक्त्यांचे दायित्व एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या प्रमुखाने घेतले. एका व्यापारी संघटनेच्या प्रमुखांनी ‘हिंदुत्वाचे कार्य करतांना युवक वर्षभर कारागृहात गेले, तर त्यांच्या घरातील अन्नधान्य यांची व्यवस्था करू’, असे सांगितले.
४. कोल्हापूर प्रकरणात ७० अधिवक्त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करणे
यानंतर जून २०२३ मध्ये कोल्हापूर येथे मुसलमानांकडून जाणीवपूर्वक केलेल्या काही कृत्यांमुळे हिंदूंचा उद्रेक झाला आणि अनेक हिंदुत्वनिष्ठांना पोलीस अन् न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागले. त्या प्रसंगी ७० अधिवक्ते खटला लढवण्यासाठी कोणतेही शुल्क न घेता त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि या सर्वांना जामीन मिळवून दिला. त्यामुळे त्या हिंदू युवकांवरील ताण अल्प झाला.
५. हिंदूंची ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवणे आवश्यक असणे
यापुढील काळात कोणत्याही हिंदूस हिंदुत्वाचे कार्य करतांना अटक झाली, तर विनामूल्य अधिवक्ता मिळवून देणे, त्यांच्या घरातील अन्नधान्य यांची व्यवस्था करणे, अशा कृती हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीत करण्याचे ठरवण्यात आले आहे. अशा प्रकारे हिंदूंची ‘इकोसिस्टम’ प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवायला पाहिजे, तरच देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी झोकून देऊन कार्य करण्यास कुणीही मागे पाहणार नाही.’
– श्री. शिवानंद स्वामी, राजारामपुरी, कोल्हापूर.