पुणे महापालिकेचे भाविकांना हौदामध्ये विसर्जन करण्याचे किंवा मूर्तीदान करण्याचे आवाहन !
पुणे – श्री गणेशमूर्तीचे विसर्जन नदी, तलाव यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांत करू नये, नागरिकांनी मूर्तीचे विसर्जन हौदामध्ये करावे किंवा ‘मूर्तीदान’ संकल्पनेच्या अंतर्गत महापालिकेच्या कर्मचार्यांकडे दान करावे, जमा झालेले निर्माल्य महानगरपालिकेच्या यंत्रणेकडे सुपूर्द करावे किंवा निर्माल्य कलशामध्ये टाकावे, असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.
महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांकडून विसर्जन व्यवस्था, हौद, टाक्या यांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येणार्या शाळा, सरकारी वसाहती, सार्वजनिक ठिकाणीही हौदांची व्यवस्था केली आहे. (कृत्रिम हौद, मूर्ती संकलन केंद्र, दान केंद्र यांसारख्या अशास्त्रीय गोष्टींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा भक्तांना वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जन करण्यास प्रोत्साहन देऊन श्री गणेशाची होणारी विटंबना रोखणे आवश्यक होते! – संपादक)
संपादकीय भूमिकाकेवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच भाविकांच्या धर्मभावनांचा विचार न करता अशा प्रकारची आवाहने केली जातात. श्री गणेशभक्तांनीच हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्या पुणे महापालिकेला जाब विचारायला पाहिजे ! |