मुरुड (रायगड) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !
मुरुड (जिल्हा रायगड) – १२ सप्टेंबरला सायंकाळच्या वेळी भोगेश्वर पाखाडी या भागात ६० घरांतील गणेशमूर्तींच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. (कायद्याचा धाक नसल्यानेच धर्मांध हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक करतात. हे बंद होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक) या दगडफेकीमुळे ६ महिला भाविकांना दगड लागून त्या घायाळ झाल्या. यानंतर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांना शांत रहाण्याचे आवाहन केले. (हिंदु सहिष्णु असल्यामुळे त्यांना शांत रहाण्याचे आवाहन पोलीस करतात. त्याऐवजी दगडफेकणार्यांना कधी पकडणार ? हे पोलिसांनी सांगावे ! – संपादक)
अद्याप दगडफेकणार्या दोन्ही मुलांवर आणि पालकांवर कारवाई न झाल्याने नागरिकांनी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना घेराव घातला. या प्रकरणावरून समस्त हिंदु समाज मुरुड तालुक्यातून एकत्र येऊन अटक करण्याची मागणी लावून धरली. मुरुड पोलीस ठाण्याच्या परिसरात शेकडो हिंदू जमा झाले होते. नागरिकांनी ‘दोन्ही मुलांना आणि पालकांना अटक करा’, अशी मागणी केली. ३ घंटे घेराव घालूनही पोलिसांनी दगडफेकणार्यांना कह्यात घेतले नाही. त्यामुळे गणेशभक्तांकडून तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली जात आहे. मुरुड शहरात तणावाचे वातावरण झाल्याने ऐन गणेशोत्सवात एक दिवस मुरुड शहर बंद ठेवण्यात आले होते.
संपादकीय भूमिका
|