Bidar Hindus Strike : पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीतील ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद केल्यावरून हिंदूंकडून मध्यरात्री धरणे आंदोलन !
|
बिदर (कर्नाटक) – येथे ११ सप्टेंबरच्या रात्री श्री गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी पोलिसांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद करण्यास हिंदूंना भाग पाडले. पोलिसांच्या या निर्णयाचा विरोध करत गणेशमंडळांचे कार्यकर्ते गणेशमूर्तींची मिरवणूक थांबवून मध्यरात्रीच रस्त्यावर बसून धरणे आंदोलन करू लागले. या वेळी पोलिसांच्या विरोधात घोषणाही दिल्या. त्यानंतर हिंदूंनी ‘जय श्रीराम’च्या घोेषणा दिल्या आणि ते श्रीरामाची भजने म्हणू लागले. स्थिती लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोचले, पण सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. आडमुठी भूमिका घेतलेल्या पोलिसांनी रात्री ३ वाजेपर्यंत हिंदूंना ध्वनीक्षेपक यंत्रणा चालू करू दिली नाही. यानंतर अधिक पोलिसांचा ताफा घटनास्थळी पाठवण्यात आला. या वेळी गणेशमंडळांच्या ध्वनीक्षेपक यंत्रणेला स्थानावरून हालवून मूर्तींच्या विसर्जनासाठी सिद्धता करावी, असे पोलिसांनी सूचित केले. यामुळे अप्रसन्न झालेल्या गणेशमंडळांच्या कार्यकर्त्यांनी तेथून निघून जाणेच पसंत केले. पहाटे ४ वाजता वातावरण शांत झाले.
संपादकीय भूमिकामध्यरात्री ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद करायला लावणारी कर्नाटक पोलीस प्रतिदिन पहाटे ५ वाजता कानाला कांठाळ्या बसवणार्या अजानच्या विरुद्ध कधीच कोणती कारवाई का करत नाही ? कर्नाटकच्या रझाकारी पोलिसांचा निषेध करावा तेवढा थोडाच ! |