नागमंगल दंगल हाताळण्‍यात पोलीस विभागाच्‍याच चुका ! – पोलीस उपमहासंचालक आर्. हितेंद्र यांचे कथन

नागमंगल (कर्नाटक) येथील दंगल

बेंगळुरू (कर्नाटक) – नागमंगल दंगलीविषयी बोलतांना राज्‍याच्‍या कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे पोलीस उपमहासंचालक आर्. हितेंद्र यांनी सांगितले की, आम्‍ही नागमंगल दंगल प्रकरणाला गंभीरपणे घेतले आहे. यामध्‍ये आमच्‍या विभागाच्‍या चुका दिसून आल्‍या आहेत. सर्व तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. नागमंगल दंगलीचे प्रकरण पूर्वनियोजित षड्‍यंत्र असल्‍याचे प्रथमदर्शनी दिसत आहे आणि घटनास्‍थळी कडक सुरक्षाव्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. पोलिस वाहनांमध्‍ये गस्‍त घालत आहेत. तसेच घटनेचा तपासही केला जात आहे.

तथापि घटनेत पोलीस विभागाने काय चुकीचे केले आणि पोलिसांनी कोणत्‍या संदर्भात चूक केली, याविषयी मात्र पोलीस उपमहासंचालकांनी काहीच सांगितलेले नाही. पोलीस विभाग अंतर्गत चर्चा करून योग्‍य निर्णय घेईल, अशी चर्चा आहे.

अल्‍पसंख्‍यांकांचे रक्षण, तर हिंदूंचा बळी ! – भाजप खासदार जगदीश शेट्टर यांचा आरोप

बेळगाव/हुब्‍बळ्ळी (कर्नाटक) – नागमंगल येथे झालेल्‍या हिंसाचाराला अल्‍पसंख्‍यांकच कारणीभूत आहेत; पण हिंदूंच्‍या विरोधात प्रकरण नोंदवण्‍यात आले आहे. काँग्रेस दोषींना वाचवते आणि हिंदूंना लक्ष्य करते, असा गंभीर आरोप भाजपचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केला.

शेट्टर पुढे म्‍हणाले की, राज्‍यात काँग्रेस सरकार सत्तेत आले की, दंगलींचे प्रमाण वाढते. श्री गणेशमूर्तीची मिरवणूक मशिदीसमोरून जाऊ नये, असे बोलण्‍याच त्‍यांना काय अधिकार आहे ? मशिदीला धोका असेल, तर सुरक्षा द्या ! त्‍याऐवजी ‘येथे-तेथे जाऊ नका’ असे म्‍हणणे योग्‍य आहे का ?

…अन्‍यथा हिंदूही पेट्रोल बाँब आणि तलवारी हातात घेतील ! – भाजपचे माजी खासदार प्रताप सिंह

मुसलमानांच्‍या कह्यातील पेट्रोल बाँब आणि तलवारी सरकारने काढून घ्‍यायला हव्‍यात. अन्‍यथा पुढील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्‍यो वेळी आम्‍हीच हातात पेट्रोल बाँब आणि तलवारी घेऊन जाऊ. त्‍यावर कायदा सुव्‍यवस्‍था बिघडली, तर सरकारलाच उत्तरदायी ठरवले जाईल. राज्‍यातील विविध जिल्‍ह्यांत भव्‍य श्री गणेशमूर्ती मिरवणुका आयोजित केल्‍या जातात. यामध्‍ये सरकारने मुसलमान गुंडांवर नियंत्रण ठेवले पाहिजे, असा इशारा भाजपचे माजी खासदार प्रताप सिंह यांनी दिला.

नागमंगल येथील पोलीस निरीक्षक निलंबित ! – कर्नाटकचे गृहमंत्री

नागमंगल येथे मुसलमानांनी केलेल्‍या आक्रमणाच्‍या सूत्रावरून कर्तव्‍यनिष्‍ठा दाखवण्‍यात अपयशी ठरलेले पोलीस निरीक्षक अशोक कुमार यांना निलंबित करण्‍यात आले आहे. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी ही माहिती दिली. याविषयी गृहमंत्री म्‍हणाले की, गणेशमूर्ती मिरवणुकीच्‍या मार्गाविषयी आधीच माहिती देण्‍यात आली होती. निरीक्षकांनी ती पालटली. कुठल्‍याही अयोग्‍य घटना झाल्‍यास पोलिसांना उत्तरदायी ठरवले जाईल, याविषयी पूर्वीच चेतावणी दिली होती. दंगलीसंदर्भात पोलीस उपअधीक्षक यांच्‍या स्‍तरावर अन्‍वेषण चालू आहे. घटनेचे कारण काय आहे, याविषयीचा अहवाल देण्‍यास सांगितले आहे. अहवाल आल्‍यावर पुढील कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

पोलीस विभाग शेवटी गृहमंत्र्यांच्‍या आदेशानुसारच वागणार ! असे असतांना काँग्रेस सरकारच्‍या अडचणी अल्‍प करण्‍यासाठी पोलीस उपमहासंचालक पोलीस विभागावर संपूर्ण चूक ढकलू पहात आहेत का, असे कुणाला वाटल्‍यास चूक ते काय ?