स्वतः गुरुस्मरणात राहून साधकांनाही गुरुमाऊलींच्या अनुसंधानात रहाण्यास सांगणारे फोंडा, गोवा येथील सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर !
भाद्रपद शुक्ल द्वादशी (१५.९.२०२४) या दिवशी पू. वामन राजंदेकर यांचा सहावा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
‘३१.३.२०२४ च्या रात्री झोपण्यापूर्वी मी आणि पू. वामन यांच्यामध्ये पुढील संवाद झाला. या संवादातून ‘संत हे सतत शिष्यभावात कसे असतात आणि त्यांच्यामध्ये साधनेविषयी किती सतर्कता असते’, हे मला शिकायला मिळाले. संत कुठल्याही प्रकारे कौतुक, लोकेषणा आणि प्रलोभन यांनी भारावून जात नाहीत. तसेच निंदा आणि अपमान यांमुळे दुःखीही होत नाहीत. हेच संतत्वाचे लक्षण आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आणि यापूर्वी होऊन गेलेल्या अनेक संतांनी हे सांगितले आहे. पू. वामन यांच्याशी झालेल्या संवादातून मला त्यांची काही गुणवैशिष्ट्ये लक्षात आली. ती येथे दिली आहेत.
पू. वामन राजंदेकर यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. पू. वामन यांनी साधकांना त्यांची आठवण काढण्यापेक्षा नारायणांची आठवण काढून आनंदी रहाण्यास सांगणे
मी (सौ. मानसी) : ‘पू. वामन, आश्रमात अनेक साधक तुमची आठवण काढत होते.
पू. वामन : साधक माझी आठवण का काढत होते ?
मी : त्यांनी २ – ३ दिवस तुम्हाला पाहिले नाही; म्हणून त्यांना तुमची आठवण आली.
पू. वामन : त्यांना माझी आठवण का आली?
मी : तुम्ही लहान आहात ना ! तुम्हाला भेटले, पाहिले आणि तुमच्याशी बोलले की, साधकांना बरे वाटते.
पू. वामन : साधकांनी माझी आठवण काढण्यापेक्षा नारायणांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) आठवण काढायची ना ! नारायण किंवा त्यांचे सत्संग यांची सतत आठवण काढल्यावर नारायण आपल्या जवळ रहातात. मग साधकांवर आवरण येत नाही. माझी आठवण काढण्यात साधकांचा वेळ वाया जायला नको. ‘आई, तू हे सगळ्यांना सांग. नारायणांच्या आठवणीमुळे सगळे साधक आनंदी रहातील.’
२. सूर्याच्या तापमानाइतकी, म्हणजे ‘कुणालाच मोजता येणार नाही’, एवढी नारायणांची आठवण येते’, असे सांगणारे पू. वामन !
मी : हो. हे खरचं आहे. मी सर्वांना सांगेन. (यावर पू. वामन यांनी स्मित केले.) पू. वामन, तुम्हाला नारायणांची आठवण येते का?
पू. वामन : हो. मला त्यांची आठवण येते. मला सूर्याच्या तापमानाइतकी नारायणांची आठवण येते. (temperature असा शब्द पू. वामन यांनी वापरला.)
मी : बापरे ! सूर्याच्या तापमानाइतकी आठवण येते, म्हणजे किती ?
पू. वामन : सूर्याजवळ कुणीच जाऊ शकत नाही आणि त्याचे खरे तापमान मोजता येत नाही. मला नारायणांची किती आठवण येते ?, हे सांगता येत नाही; परंतु सूर्याच्या तापमानाइतकी येते.
३. गुरुस्मरणाची गणना सूर्य नारायणाच्या तापमानाशी करणारे पू. वामन यांची प्रगल्भता पाहून निःशब्द होणे
पू. वामन यांचे उत्तर ऐकून मी निःशब्द झाले. वयाच्या ५ व्या वर्षी इतकी समज असणे, हे आश्चर्य वाटण्यासारखेच आहे. ‘गुरुस्मरणाची गणना होऊच शकत नाही’, हे सांगतांना ती करायची झालीच, तर प्रत्यक्ष सूर्य नारायणाच्या तापमानाशी करावी लागेल. एवढी प्रगल्भता असणे, हे केवळ प.पू. गुरुदेवच घडवू शकतात. तसेच सामान्य माणसाला ‘कुणी आपली आठवण काढली’, हे कळल्यावर आनंद होतो; परंतु संतांना हेसुद्धा नको असते. हे या उदाहरणावरून सिद्ध झाले.
‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच हे अनुभवण्याची संधी मला मिळाली आणि त्यातून शिकायला मिळाले’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांची आई) (वय ४१ वर्षे) फोंडा, गोवा (६.६.२०२४)
६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली बालसाधिका कु. श्रिया राजंदेकर (वय १२ वर्षे) हिने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !प.पू. डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) चरणी राखी पौर्णिमेनिमित्त माझा भावपूर्ण शिरसाष्टांग नमस्कार ! परम पूज्य, खर्या अर्थाने तुम्हीच जन्मोजन्मी माझे रक्षण करत आहात. या जन्मात तुम्ही तुमचे एक छोटेसे सगुण रूप सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन यांच्या रूपाने (चि. श्रिया राजंदेकर हिचे लहान भाऊ पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर) मला दिले आहे. यासाठी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – तुमची छोटी, कु. श्रिया राजंदेकर (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय १२ वर्षे), फोंडा, गोवा. (३१.८.२०२३) |