डिचोली येथे मंदिरांत चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रीय
आतील पेठ परिसरातील श्री शिवलिंग मंदिरातील दानपेटी फोडली
डिचोली, १३ सप्टेंबर (वार्ता.) – डिचोली शहरात मंदिरांत चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रीय झाली आहे. अज्ञाट चोरट्यांनी १२ सप्टेंबरच्या रात्री शहरातील आतील पेठ परिसरातील ‘वृंदावन अपार्टमेंट’मधील श्री शिवलिंग मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरली. चोरांनी मंदिराच्या डाव्या बाजूने असलेल्या फाटकाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
१३ सप्टेंबर या दिवशी पुजारी मंदिरात आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. मंदिराच्या विश्वस्तांनी पोलिसात रितसर तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील अन्वेषण चालू आहे.
अडीच मासांत परिसरातील ७ मंदिरांमध्ये चोरी
डिचोली परिसरात मागील अडीच मासांत ७ मंदिरांमध्ये चोरी झालेली आहे. जून मासात चोरांनी एकाच रात्री शहरातील ४ मंदिरांत चोरी केली होती. या चोर्यांचा तपास लागलेला नसतांनाच एक मासाच्या कालावधीत म्हणजेच जुलै मासात शहरात एकाच रात्री आणखी २ मंदिरांत चोरी करण्यात आली.