आळंदीतील मद्यविक्री आणि वेश्याव्यवसाय यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
आळंदी – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींसमोर नतमस्तक झाल्याविना आपण पुढे जात नाही. माऊलींच्या आळंदीमध्ये घडणारे प्रकार चिंताजनक आहेत. पोलिसांना हवे ते दिले आहे. त्यामुळे आळंदीतील मद्यविक्री आणि वेश्याव्यवसाय बंद करण्याचे दायित्व कुणाचे आहे ? येथे असणार्या अधिकार्यांनी त्याची नोंद घ्यावी. हे व्यवसाय बंद झाले नाहीत, तर पोलिसांवर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस अधिकार्यांना दिली आहे. आळंदीतील विविध विकासकामांचे भूमीपूजन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.मंदिर परिसरात मद्यविक्री, वेश्याव्यवसाय चालू असल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्त्यांनी पवार यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर पवार यांनी हे उत्तर दिले. पुण्यात ७, तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी ४ पोलीस ठाणी संमत केली आहेत, असेही सांगितले.
संपादकीय भूमिका
|