NIA Raid : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या पंजाबमधील खलिस्तानी अड्ड्यांवर धाडी !
अमृतसर – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) अमृतसर, गुरुदासपूर, जालंधर आदी १४ ठिकाणच्या खलिस्तानी अड्ड्यांवर धाडी घातल्या. गेल्या वर्षी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी चालू असलेल्या अन्वेषणात महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर ‘एन्.आय.ए.’ने य धाडी घातल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी ‘एन्.आय.ए.’ने ५ सप्टेंबला इंदरपाल सिंह गाबा या अफगाणी वंशाच्या ब्रिटिश नागरिकावर आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले होते. गाबा याच्यावर गेल्या वर्षी २२ मार्च या दिवशी ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारतविरोधी आंदोलनात भाग घेतल्याचा आरोप आहे. त्याला डिसेंबर २०२३ मध्ये लंडनहून पाकिस्तानमार्गे आल्यावर कह्यात घेण्यात आले होते. १ एप्रिलला त्याला अटक करण्यात आली होती. अमृतपाल सिंह आणि त्याची संघटना ‘वारिस पंजाब दे’ यांच्या विरोधात चालू असलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून त्याने भारतविरोधी आंदोलन केले होते.
संपादकीय भूमिकाकेवळ धाडी घालणे नव्हे, तर खलिस्तानवाद मोडून काढणे अपेक्षित आहे ! |