रोहा (रायगड) येथे स्फोट !
रामनाथ (अलिबाग) – रोहा येथील ‘साधना नायट्रोकेम’ आस्थापनात सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मिथेनॉल साठवण टाकीवर वेल्डींगचे काम चालू असतांना अचानक साठवण टाकीचा स्फोट झाला. यामध्ये २ कामगारांचा मृत्यू झाला असून अन्य ४ जण गंभीर घायाळ झाले आहेत. घायाळांवर रोहा येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमनदल, पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले.