जनता पुराने त्रस्त; काँग्रेस खासदार रिल बनवण्यात व्यस्त !
भंडारा – गेल्या दोन दिवसांत आलेल्या मुसळधार पावसाने गोंदिया, भंडारा जिल्ह्यात थैमान घातले आहे. अनेकांची घरे पडली आहेत. शेतीचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सर्वत्र पुरामुळे हाहाःकार माजलेला असतांना पहाणी करायला गेलेले काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांचा मात्र ‘स्टंटबाजी’ करतांनाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे खासदार पडोळे पुराच्या पाण्यात कारच्या बोनेटवर बसून रील बनवतांना दिसले. त्यामुळे त्यांच्यावर संतप्त टीका होत आहे.
जनतेवर संकटांचा डोंगर कोसळलेला असतांना खासदार स्टंटबाजी करत व्हिडिओ काढत असतील, तर जनतेने त्यांना निवडणुकीच्या वेळी योग्य धडा शिकवण्याची वेळ आली. काँग्रेसच्या अशा नेत्यांमुळेच ६ दशके देशाची प्रगती होऊ शकली नाही !