पुणे येथे श्री गणेशोत्सवांमध्ये लेझर दिवे वापरल्या प्रकरणी ६ जणांवर गुन्हे नोंद !
आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन प्रकरणी ३ मंडळांवर गुन्हे नोंद
पुणे – सामाजिक उत्सवांमध्ये ‘लेझर दिव्यां’ना बंदी घालण्यात आली आहे, तरीही श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठानपनादिनी मिरवणुकीमध्ये ‘लेझर दिव्यां’चा उपयोग करणार्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. लेझर दिव्यांसाठी साहित्य पुरवणार्या ६ जणांविरोधात गुन्हे नोंद केले आहेत. आतापर्यंत आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणार्या मुंढव्यातील ३ मंडळांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गुन्हा नोंद केलेल्यांकडून लेझर दिवा, ध्वनीवर्धक यंत्रणा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली. दहीहंडी आणि श्री गणेशोत्सवांमध्ये ‘लेझर दिव्यां’चा वापर केल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकींमध्ये लेझर दिव्यांचा वापर, उच्च क्षमतेची ध्वनीवर्धक यंत्रणा वापरल्यास कारवाई करण्याची चेतावणी पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकींमध्ये पोलिसांकडून नेमकी काय कारवाई करण्यात येणार याकडे श्री गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे.
संपादकीय भूमिका
|