रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. श्री. रवि निर्मल ग्यानचंदानी (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप) पुसद, यवतमाळ, महाराष्ट्र.
अ. ‘आपल्या विचारांच्या पलीकडे विलक्षण गोष्टी असू शकतात आणि घडणार्या सर्व घडामोडींमागे कार्यकारणभाव असतो’, हे लक्षात आले.’
२. अधिवक्ता नामदेव किसनराव गरड (शहरमंत्री, रा.स्व.संघ), शेवगाव, महाराष्ट्र.
अ. ‘सध्या विज्ञानयुग असले, तरी अध्यात्मातील संशोधन नाकारता येत नाही.’
आ. अनेक प्रयोगांद्वारे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जांविषयी मानवी जीवनावर होणार्या परिणामांचा अभ्यास अनुभवला.’
३. अधिवक्ता गणेश नागरगोजे, चेंबूर, मुंबई.
अ. ‘पुष्कळ चांगला विषय आहे. मी कधीही न अनुभवलेल्या गोष्टी मला पहायला आणि शिकायला मिळाल्या.’
४. अधिवक्ता ओंकार वासुदेव पाटील, ठाणे, महाराष्ट्र.
अ. ‘उत्तम प्रकारे प्रदर्शन दाखवण्यात आले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २८.६.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |