उत्सवाच्या निमित्ताने संघटित व्हा !
गणेशोत्सव विशेष…
भारत पारतंत्र्यात असतांना, म्हणजे वर्ष १९४७ पूर्वी भारतीय असंघटित होते. त्यामुळे इंग्रज भारतियांवर सहजपणे अत्याचार करत होते. थोडेसे सैन्य घेऊन भारतात इंग्रज व्यापार करण्यासाठी आले आणि भारतावर राज्य करू लागले. लोकमान्य टिळक यांनी ‘भारतियांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हिंदूंना संघटित करण्याची आवश्यकता आहे’, हे त्यांनी जाणले. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू करून जनतेला इंग्रजांच्या विरोधात जागृत करण्याचे आणि स्वातंत्र्यासाठी युवकांचे संघटन करण्याचे कार्य चालू केले. युवकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होऊन संघटितपणे इंग्रजांविरोधात कार्य करण्याची प्रेरणा त्यांना त्यातून मिळाली.
आताही हिंदूंवर जळी, स्थळी होणार्या धर्मांधांच्या आक्रमणामुळे हिंदू पारतंत्र्याचीच स्थिती अनुभवत आहेत. सर्वत्रचे हिंदू धर्मांधांच्या आक्रमणामुळे त्रस्त झाले आहेत. धर्मांध सगळीकडे थूंक जिहाद करत आहेत. सर्वत्र त्यांची दहशत निर्माण करत आहेत. सर्व व्यवसाय हस्तगत करत आहेत. स्वसंरक्षणासाठी पुढे सरसावणार्या कित्येक हिंदु तरुणांच्या हत्या करत आहेत. दंगली घडवत आहेत. दगडफेक करत आहेत. भूमी लाटत आहेत. महिला, युवती लव्ह जिहादमध्ये फसत आहेत. मुलींचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात घडत आहे. कित्येक मुली बेपत्ता होत आहेत. त्यामुळे हिंदूंची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. धर्मांध गायी कापत आहेत. मंदिरांची विटंबना करत आहेत, म्हणजे एक प्रकारे हिंदू गुलामीतच आहेत आणि असंघटित आहेत. संघटित असते, तर क्रांती झाली असती. त्यामुळे हिंदूंना भयमुक्त जीवन जगण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना ‘हिंदूंचे संघटन करणे’, हे त्यांचे दायित्व वाटले पाहिजे. गणेशोत्सवाच्या संधीचा लाभ घेऊन गणेशोत्सव मंडळांनी हिंदूंना होता होईतो जागरूक करणे आवश्यक आहे.
गेल्या काही वर्षांत गावातील मंडळे प्रथमोपचार, रक्तदान, वाढती लोकसंख्या अशा सामाजिक विषयावर देखावे करून प्रबोधन करत आहेत; परंतु काही अपवादात्मक मंडळांनी लव्ह जिहादविषयी जागृती करणारे देखावे केले, काश्मिरी हिंदूंच्या समस्यावर प्रकाश टाकला. या वर्षी खरे तर मोठ्या प्रमाणात मंडळांनी स्त्री अत्याचाराविरोधात आवाज उठवणे, वक्फ बोर्डाच्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक होते. प्रत्येक मंडळातील काही युवकांना जरी धर्मशिक्षण मिळाले, तर ते राष्ट्रकार्यात जोमाने सहभागी होऊ शकतील. ते त्यांचा वेळ विधायक कार्यास लावतील. त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होऊन हिंदूंचे संघटन आणि बळ वाढेल; जेणेकरून जिहादी धर्मांधावर वचक बसेल. युवा पिढीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून संघटित करणे, हीच सध्याची साधना आहे. हीच श्री गणेशाची खरी पूजा ठरेल आणि त्याची कृपा प्राप्त होईल !
– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.