महापालिका उपायुक्तांच्या खात्यांमध्ये पालट !
नवी मुंबई – प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपायुक्तांच्या खात्यांमध्ये पुढील काही पालट केले आहेत. उपायुक्त शरद पवार यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग मालमत्ता कर आणि आपत्ती व्यवस्थापन; राहुल गेठे यांच्याकडे अतिक्रमण विभाग परवाना विभाग; भागवत डोईफोडे यांच्याकडे निवडणूक विभाग, १४ महसुली गावांसंबंधित हस्तांतरण प्रक्रिया आणि तत्संबंधित प्रशासकीय लेखा, अतिक्रमण, तांत्रिक सेवा विषयक कामकाज आणि मालमत्ता विभाग देण्यात आला आहे.