परम पूज्य डॉक्टरांचे दुसरे सगुण रूप, म्हणजेच सद्गुरु राजेंद्र शिंदे ।
‘सद्गुरु राजेंद्र शिंदे (सद्गुरु दादांच्या) यांच्या वाढदिवसानिमित्त सुचलेली कविता परम पूज्य गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) आणि सद्गुरु दादांच्या चरणी अर्पण करते. त्यांनीच ती माझ्याकडून लिहून घेतली. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
परम पूज्य डॉक्टर (टीप १) म्हणजे मधूर स्मितहास्य ।
सद्गुरु दादा म्हणजे निखळ मनमोहक हास्य ।। १ ।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे प्रीतीमय कोमल नेत्र ।
सद्गुरु दादा म्हणजे प्रेमळ करुणामय कटाक्ष ।। २ ।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे तेजोमय दिव्य रूप ।
सद्गुरु दादा म्हणजे मनमोहक सुंदर रूप ।। ३ ।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे मधूर सुमधूर वाणी ।
सद्गुरु दादा म्हणजे लाघवी चैतन्यवाणी ।। ४ ।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे साधकांवर अपार प्रीती ।
सद्गुरु दादा म्हणजे साधकांवर पितृवत प्रीती ।। ५ ।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे दिव्य अनुभूतींना प्रारंभ ।
सद्गुरु दादा म्हणजे आंतरिक पालटांना प्रारंभ ।। ६ ।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे शांतीची अनुभूती ।
सद्गुरु दादा म्हणजे भक्तीभावाची अनुभूती ।। ७ ।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे आनंदाची उधळण ।
सद्गुरु दादा म्हणजे आनंदाची पखरण ।। ८ ।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे स्वतः हरून साधकांना जिंकवणे ।
सद्गुरु दादा म्हणजे स्वतः लहान होऊन बालसाधकांकडूनही शिकणे ।। ९।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे ग्रंथांची मालिका ।
सद्गुरु दादा म्हणजे नवनवीन प्रेरणादायी प्रयत्नांची मालिका ।। १० ।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे धर्माचा अधर्मावर विजय ।
सद्गुरु दादा म्हणजे गुणांचा स्वभावदोष आणि अहं यांच्यावर विजय ।। ११ ।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे सर्व साधकांचे आश्रयस्थान ।
सद्गुरु दादा म्हणजे सर्व साधकांचे हृदयमंदिर ।। १२ ।।
परम पूज्य डॉक्टर आणि सद्गुरु दादा म्हणजे सर्व साधकांचे प्राण ।
सद्गुरु दादा म्हणजे दुसरे परम पूज्य डॉक्टर ।। १३ ।।
टीप १ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले.
– अज्ञानी सेविका,
सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी (वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |