रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रम परिसरातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतांना आलेली अनुभूती !
श्री सिद्धिविनायकाची सोंड हलत असल्याचे दिसणे आणि त्याने ‘हिंदु राष्ट्र लवकरच येणार आहे’, असा आशीर्वाद दिल्याचे जाणवून भाव जागृत होणे
‘फेब्रुवारी २०२४ मध्ये मी एका सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. मी प्रथम आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी गेले. त्या वेळी मी श्री सिद्धिविनायकाचे भावपूर्ण दर्शन घेत होते. तेव्हा मला त्याची सोंड हालत असल्याचे दिसले. मी पहातच राहिले. श्री सिद्धिविनायक माझ्याकडे प्रेमाने पहात होता. ‘हिंदु राष्ट्र लवकरच येणार आहे’, असा आशीर्वाद तो मला आणि सर्व साधकांना देत होता. नंतर माझा भाव जागृत झाला आणि मी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त केली.’
– सौ. उज्ज्वला सुधीर जाधव, सातारा (२५.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |