चंद्रपूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी एकाला अटक
चंद्रपूर – चिमूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर चौघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या हालचालीवरून आईला संशय आला. मुलीची आरोग्य पडताळणी केली असता मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आले. चौघांनी अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले.
संदीप देवीदास खांडेकर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तीन आरोपी पसार आहेत. चौघांनी पीडितेला लग्नाचे आणि पैशांचे आमीष देत वेगवेगळ्या दिवशी, पीडिता घरी एकटीच असतांना बळजोरीने लैंगिक अत्याचार केले.
बल्लारपूर शहरात बलात्कारपीडित युवतीची आत्महत्या !
युवतींवर वाढते बलात्कार हे नीतीमत्ता आणि पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण !
बल्लारपूर शहरात बलात्कारपीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेत ३ सप्टेंबर या दिवशी आत्महत्या केली. २ सप्टेंबरच्या रात्री पीडितेवर आरोपी शिवम दुपारे याने बल्लारपूर येथील एका हॉटेलवर नेऊन बलात्कार केला होता. या प्रकरणाला वाचा फुटल्यावर या प्रकरणी आरोपी मित्रावर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.