Mohini Tomar : कासगंज (उत्तरप्रदेश) येथे कालव्यात सापडला अधिवक्त्या मोहिनी तोमर यांचा मृतदेह !
|
कासगंज (उत्तरप्रदेश) – येथील जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारातून बेपत्ता झालेल्या अधिवक्त्या मोहिनी तोमर यांचा मृतदेह ३ सप्टेंबरला हजारा कालव्यात सापडला. याची माहिती पोलिसांनी नुकतीच दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हैदर आणि मुस्तफा यांच्यासह ४ जणांना अटक केली आहे.
यासंदर्भात स्थानिक प्रसारमाध्यमांकडून दोन तर्क करण्यात येत आहेत.
Body of Advocate Mohini Tomar found in a canal in Kasganj, Uttar Pradesh; Tomar was fighting to get justice for a Hindu who had been brutally assaulted by three Muslims.
Police arrest Advocates Mustafa Kamil, Asad Mustafa, Haider Mustafa, and Law student Salman Mustafa
The… pic.twitter.com/dJME2yx7va
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 12, 2024
१. पहिले प्रकरण असे आहे की, एका स्थानिक क्रिकेट सामन्यात पराभव झाल्याने हैदर, मुस्तफा आणि सलमान या दोघांनी शिवशंकर या हिंदूला शिवीगाळ करून मारहाण केली होती. अधिवक्त्या मोहिनी तोमर या शिवशंकर यांच्या वतीने हे प्रकरण न्यायालयात लढत होत्या. ‘हे प्रकरण उच्च न्यायालयात जाईल’, असे दिसू लागल्यावर मला आणि अधिवक्त्या तोमर यांना धमक्या मिळाल्या होत्या’, असे शिवशंकर यांनी सांगितले. तोमर यांच्या पतीनेही यास दुजोरा दिला आहे.
२. जानेवारी २०१८ मध्ये येथे झालेल्या ‘तिरंगा यात्रे’त मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले होते. त्यामध्ये चंदन गुप्ता उपाख्य अभिषेक नावाच्या धर्मप्रेमी हिंदूची हत्या झाली होती. त्याच्या हत्येचा आरोपी मुनाजीर रफी याच्या जामिनालाही अधिवक्त्या तोमर यांनी विरोध केला होता.
३. तोमर यांच्या हत्येमुळे स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संतापले असून त्यांनी गावातील रस्ते रोखून धरले. तसेच अधिवक्त्यांनीही महामार्गावर बसून निदर्शने केली.
संपादकीय भूमिकाहिंदूंना न्याय मिळावा, यासाठी स्वत:चे प्राण धोक्यात घालून लढणार्या महिला अधिवक्त्यांची हत्या होणे, ही स्थिती १०० कोटी हिंदूंसाठी लज्जास्पद ! |