Protest Against Illegal Shimla Mosque : मशीद पाडण्याची मागणी करणार्या हिंदूंवर पोलिसांकडून लाठीमार, अनेक हिंदू घायाळ !
शिमला येथील बेकायदेशीर मशिदीच्या विरोधातील आंदोलन चिघळले !
शिमला (हिमाचल प्रदेश) : राजधानी शिमला येथे संजौली भागात उभी असलेली ५ मजली बेकायदेशीर मशीद पाडण्याची मागणी आता तीव्र झाली आहे. ११ सप्टेंबरच्या सकाळी हिंदू मोठ्या संख्येने मशिदीच्या दिशेने चालू लागले. त्या वेळी पोलिसांनी हिंदु जागरण मंचचे माजी महामंत्री कमल गौतम यांना अटक केली.
त्यामुळे संतापलेल्या हिंदूंनी आंदोलन तीव्र केले. पोलिसांनी हिंदूंना अडवत त्यांच्यावर लाठीमार केला, तसेच पाण्याचा जोरदार मारा केला. यात अनेक हिंदू घायाळ झाल्याचे वृत्त आहे.
१. राज्यातील काँग्रेस सरकारने या बेकायदेशीर मशिदीला हिंदूंनी विरोध करू नये, यासाठी तेथील परिसराचे छावणीत रूपांतर केले होते. येथे मोठ्या प्रमाणात अडथळे (बॅरिकेड्स) निर्माण करण्यात आले आहेत.
Hindus demanding demolition of mosque lathi-charged by Police, many Hindus injured
✊Protest against illegal mosque in Shimla erupts
🛑The Congress government of Himachal Pradesh, through its Police, is shielding the illegal mosque while making a disgraceful attempt to suppress… pic.twitter.com/9DZ1exJBdf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 11, 2024
२. नि:शस्त्र हिंदु आंदोलक संजौली येथे पोचताच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार चालू केला. (असे आंदोलन धर्मांध मुसलमान करत असते, तर पोलिसांनी अशा प्रकारे काठ्या उगारल्या असत्या का ? हिंदू निश:स्त्र आंदोलने करतात. त्यामुळे त्यांच्यावरच शस्त्र चालवले जाते का, याचाही आता विचार व्हावा का ? – संपादक)
Thousands protest against the illegal mosque in Sanjauli Shimla, Himachal Pradesh
Hindus gathered to express concerns, leading to a standoff with police.
Why should Hindus protest ?
Why was illegal construction allowed?
Why wasn’t it stopped earlier? pic.twitter.com/T1LFNw3Xet
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 11, 2024
३. गेल्या आठवड्याभरापासून सरकारला संजौली मशीद वादावर कोणताच तोडगा काढता आलेला नाही.
काय आहे प्रकरण ?३१ ऑगस्ट या दिवशी स्थानिक तरुण यशपालचा काही मुसलमान मुलांसमवेत वाद झाला होता. त्यानंतर मुसलमानांनी यशपालवर आक्रमण करून त्याला गंभीर घायाळ केले. त्यानंतर हे तरुण संजौलीच्या मशिदीत लपून बसल्याचे समोर आले. या ठिकाणी जमलेल्या हिंदूंनी या तरुणांवर कारवाई करण्यासमवेतच ही मशीद बेकायदेशीर असल्याचे सांगितले. पोलिसांनी गुलनवाझ, सारिक, सैफ अली आणि रोहित अशा चौघांना अटक तर केली; परंतु या घटनेमुळे केंद्रस्थानी आलेल्या या मशिदीवर मात्र नमती भूमिका घेतली. स्थानिक हिंदूंनी आरोप केला आहे की, या ५ मजली मशिदीतील केवळ २ मजले कायदेशीर आहेत. उर्वरित ३ मजले हे वर्ष २०१० नंतर बांधण्यात आले. शिमला महानगरपालिकेने हे बांधकाम चालू असतांना मशिदीला ३०-३५ नोटिसा पाठवल्या होत्या; परंतु बांधकाम थांबवले नाही. महापालिकेने आजूबाजूचे बेकायदेशीर बांधकाम पाडले; परंतु या मशिदीवर एक हातोडाही चालवला नाही. आज ही ५ मजली मशीद शहराच्या मध्यभागी उभी आहे. हे प्रकरण अद्याप न्यायालयात असल्याचे राज्यातील काँग्रेस सरकारने सांगून यातून स्वत:चे हात झटकले आहेत. |
Hindu Resurgence has kickstarted from the Devbhoomi #HimachalPradesh.@kamalgautamhp ji addressed hundreds of Hindus in the town of Nerwa Choupal today afternoon.
His speech gives an experience of the pre-independence era. Well, Hindu upsurge on roads signals a new dawn too -… pic.twitter.com/DDrURCdH6V
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 19, 2024
संपादकीय भूमिका
|