Karnataka CM Siddaramaiah : (म्हणे) ‘मंदिराच्या विकासाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कारवाई केली जाईल !’ – मुख्यमंत्री सिद्धारामय्या
म्हैसुरू (कर्नाटक) येथील सुप्रसिद्ध श्री चामुंडीमातेच्या मंदिराच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांचे विधान
म्हैसुरू (कर्नाटक) – शहरातील चामुंडीबेटावर असलेल्या श्री चामुंडीमातेच्या मंदिरात योग्य दर्जाची व्यवस्था न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. श्री क्षेत्राच्या विकासासाठी निधीची न्यूनता नाही. मागितलेल्या सर्व निधीची वेळोवेळी पूर्तता केली जात असूनही कामे अपेक्षित गतीने होत नाहीत. हे मी सहन करणार नाही. वेळेत काम पूर्ण न झाल्यास कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी दिला. येथे झालेल्या श्री चामुंडेश्वरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पहिल्या सभेत ते बोलत होते.
या वेळी ते म्हणाले की,
१. मंदिराच्या परंपरा आणि इतिहास यांचे रक्षण करण्यासमवेतच त्याचा विकास करणे आवश्यक आहे.
२. प्राधिकरणाची कार्यप्रणाली व्यवस्थित असावी. स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. वाहनतळासाठी अधिक सुसज्ज व्यवस्था करणे आवश्यक आहे.
३. माता शक्तिदेवता श्री चामुंडीदेवीविषयी कोट्यवधी लोकांना अपार भक्ती, श्रद्धा आणि विश्वास आहे. देशाच्या कानाकोपर्यांतून भक्तगण येथे येतात. या सर्वांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
४. कोप्पळ हुलिगम्मा मंदिर आणि घाटी सुब्रह्मण्य मंदिर यांच्या अधिक विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचीही मोठी मागणी आहे. यासंदर्भातही पावले उचलली जातील.
संपादकीय भूमिकाहिंदुद्वेषी सिद्धरामय्या यांना मंदिराच्या विकासाची काळजी कधीपासून होऊ लागली ? त्यांना त्याविषयी खरोखरंच काळजी असेल, तर त्यांनी प्रथम कर्नाटकातील मंदिरांचे सरकारीकरण रहित करून ते भक्तांच्या हाती सोपवले पाहिजे ! |