Islamic Activist Majid Freeman Jailed : लेस्टर (ब्रिटन) येथे हिंदुविरोधी दंगल भडकवणारा माजिद फ्रीमन याला कारावास
२२ आठवड्यांच्या कारावासाची शिक्षा
लेस्टर (ब्रिटन) – येथे वर्ष २०२२ मध्ये हिंदुविरोधी दंगल भडकावणारा माजिद फ्रीमन याला २२ आठवडे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर आतंकवाद आणि आतंकवादाशी संबंधित गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे. नॉर्थहॅम्प्टन दंडाधिकारी न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश अमर मेहता यांनी ९ सप्टेंबर या दिवशी त्याला कलम ४ अंतर्गत शिक्षा सुनावली. माजिद फ्रीमन याने वर्ष २०२२ मध्ये लेेस्टर येथे झालेल्या हिंदुविरोधी दंगलीत हिंदूंविषयी खोटी आणि चुकीची माहिती पसरवली होती. तसेच हिंदूंची मंदिरे आणि घरे यांना लक्ष्य करून हिंदूंवर आक्रमण केले होते.
I$l@m!c activist, Majid Freeman jailed for 22 weeks for inciting anti-Hindu riots in #Leicester (Britain).
👉 Such anti-Hindu and anti-social elements should be imprisoned for life.
A mere 22 weeks confinement would do no good.#LeicesterViolence #HindusUnderAttack… pic.twitter.com/ps2IeJpRQd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 11, 2024
१. लेस्टर येथील समस्यांना वाचा फोडणार्या ‘इनसाइट यू.के.’ या संघटनेने ‘एक्स’वर याची माहिती दिली आहे.
२. २८ ऑगस्ट २०२२ या दिवशी टी-२० क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. त्यानंतर माजिद फ्रीमन याने भारतीय ध्वजाचा अपमान करणार्या व्यक्तीला साहाय्य केले होते.
३. या वेळी हिंदू तणाव शांत करण्याचा प्रयत्न करत असतांनाही फ्रीमन याने भारतीय ध्वजाचा अवमान करण्यास चिथावणी देणे चालूच ठेवले होते. त्याने कुराण जाळल्याची अफवाही पसरवली होती. त्यानंतर दंगल उसळली होती.
माजिद फ्रीमन याचा इस्लामी आतंकवादाला पाठिंबा
माजिद फ्रीमन गाझावरील इस्रायलच्या कारवाईला विरोध करत आहे. त्याने ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी इस्रायलवर हमासने केलेल्या आतंकवादी आक्रमणाला पाठिंबा दिला होता. सामाजिक माध्यमांवरही त्याने हमास आणि पॅलेस्टाईन यांना पाठिंबा दिला होता.
संपादकीय भूमिका२२ आठवड्यांची शिक्षा देऊन काय उपयोग ? त्यानंतर तो बाहेर येऊन हिंदुविरोधी कारवायाच करणार ! अशांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक ! |