मुंबईतील लघुवाद न्यायालयातील अनुवादकाला २५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना अटक !
मुंबई – न्याय बाजूने देण्यासाठी एका हॉटेल व्यावसायिकाकडून २५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना भ्रष्टाचारविरोधी पथकाने मुंबईतील लघुवाद न्यायालयाचा अनुवादक विशाल सावंत याला ९ सप्टेंबर या दिवशी अटक केली. भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्याच्या अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्र्रकरणी तक्रारदाराने भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार केली होती. यानंतर पथकाने सापळा रचून विशाल सावंत याला लाच स्वीकारतांना कह्यात घेतले.
संपादकीय भूमिकानिकाल बाजूने देण्यासाठी अनुवादकाने एवढ्या मोठ्या रकमेची मागणी करतो, हा प्रकार संशयास्पद आहे. यामध्ये न्यायव्यवस्थेतील आणखी कुणी वरिष्ठ पदाधिकारी आहेत का ? या दृष्टीनेही अन्वेषण व्हावे ! |