ऑक्टो रिक्शा आणि टॅक्सी मंडळासाठी सरकारकडून ५० कोटीचे अनुदान !
मुंबई, १० सप्टेंबर (वार्ता.) – राज्यशासनाने नुकत्याच स्थापन केलेल्या धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्शा आणि मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ५० कोटी रुपयांचे अनुदान घोषित केले आहे. हा निधी परिवहन विभागाकडे देण्यात येणार आहे. गृह विभागाकडून १० सप्टेंबर या दिवशी याविषयी शासन आदेश काढण्यात आला.